LIVE UPDATES

Sindhudurg Job Fair : रोजगार महाकुंभ मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा

जिल्ह्यात १२ ठिकाणी आयोजन : ९६ उद्योजक व कंपन्यांकडून १ हजार ८४९ रिक्तपदांसाठी होणार प्रक्रिया
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 07:15 PM
views 393  views
Sindhudurg Job Fair

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ–महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील या रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत ९६ उद्योजक व कंपन्यांनी १ हजार ८४९ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. विविध नामांकित कंपन्या व आस्थापनांमार्फत विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सावंतवाडी येथील टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ८ कंपन्यांमार्फत १२८ रिक्तपदांसाठी, कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात १५ कंपन्यांमार्फत ३१९ रिक्तपदांसाठी, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे ९ कंपन्यांमार्फत २०५ रिक्तपदांसाठी, वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत ६० रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ११ कंपन्यांमार्फत ३७८ रिक्तपदांसाठी, कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ८ कंपन्यांमार्फत ८६ रिक्तपदांसाठी, कणकवली येथील एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ६ कंपन्यांमार्फत १३३ रिक्तपदांसाठी, कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा (डिगस) येथील श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालयात ३ कंपन्यांमार्फत ३३ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ८ कंपन्यांमार्फत १४७ रिक्तपदांसाठी, देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात १० कंपन्यांमार्फत १२४ रिक्तपदांसाठी, वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ प्रक्रिया संशोधन केंद्रात ७ कंपन्यांमार्फत २२४ रिक्तपदांसाठी, तर सावंतवाडी येथील बी.टी.आर.आय. येथे ३ कंपन्यांमार्फत १२ रिक्तपदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थानिक तरुण-तरुणींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग अमिन इ. तडवी यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यक्रमस्थळी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८३५ आहे. तसेच कार्यालयाच्या ‘sindhudurgrojgar’ या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्पृहा दळवीची चमक
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
दोडामार्गात मटक्याने पुन्हा डोकं वर काढलं
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
रत्नागिरीची भूजल पातळी ५.२२ मीटरने घटली
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
बापर्डे गायकवाडवाडीत ‘खेळ पैठणीचा’
October 21, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी
October 21, 2026
Recruitment 2026 : एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ५० पदांसाठी भरती, ५० हजार रुपये मिळणार स्टायपेंड
October 13, 2026
Indian Coast Guard Recruitment 2026 for 10th and 12th pass candidates
१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांसाठी भरती
October 09, 2026
ITBP Recruitment 2026 : १२वी पास तरुणांसाठी आयटीबीपीमध्ये नोकरीची संधी, अशी आहे निवड प्रक्रिया
October 01, 2026