LIVE UPDATES

मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ येथे भीषण अपघात

रिक्षातील दोन मुलांसह पाच जण गंभीर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 15:37 PM
views 101  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील उतारावर रिक्षाला मागून येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील उतारावरून जात होती. याचवेळी मागून येणाऱ्या इनोव्हा कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षातील पाच जण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.