LIVE UPDATES

कणकवली तालुका आत्मा समिती अध्यक्षपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 04:32 PM
views 8  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली :  कणकवली तालुकास्तरीय शेतकरी सल्ला आत्मा समितीच्या अध्यक्षपदी हरकुळ बुद्रुक गावचे सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर यांची निवड करण्यात आली. कणकवली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. खासदार  नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देत आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या योजना व प्रशिक्षणांचे आयोजन करत शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार असल्याचे नूतन अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी सांगितले.

कणकवली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या पहिल्या सभेस कणकवली पं.स.च्या सभापती हर्षदा वाळके, जि.प.च्या समाजकल्याण सभापती रूहिता तांबे, माजी जि.प.अध्यक्ष व जि.प.सदस्य संदेश सावंत, जि.प.सदस्य मनोज रावराणे, सौ. सुप्रिया मेस्त्री, राजन चिके, संतोष पारकर, प्राची इस्वलकर, शितल दळवी हे पदसिध्द सदस्य तर सदस्य म्हणून महेंद्र राणे-वाघेरी, आनंद ठाकूर-हरकुळ बुद्रुक, लक्ष्मण घाडीगावकर-वागदे, दत्तकुमार सामंत-फोंडाघाट, ज्योती देसाई-नांदगाव, सूर्यकांत परूळेकर-ओटव, पुंडलिक सावंत-बिडवाडी, सुरेश गावकर-दारिस्ते, सागर साटम-डामरे, संजय रावले-हरकुळखुर्द, भाग्यलक्ष्मी साटम-आयनल, राजेंद्र राणे-घोणसरी, सत्यवान चोरगे-कासार्डे, मोहन भोगले-तळेरे, सूर्यकांत परूळेकर-ओटव, स्नेहलता सावंत- वरवडे, संजय सावंत-सांगवे आदी सदस्य तसेच कणकवली तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राकेश हुले आदी उपस्थित होते.

समिती सभेत अध्यक्षपदी हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर यांची निवड करण्यात आली. आत्मा समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीकोनातून नाविन्यपूर्ण योजनांवर भर दिला जाणार आहे. आपण गेली ४० वर्षे शेती, बागायती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आत्मा समितीच्या माध्यमातून प्रशिक्षणे, शेतकरी अभ्यास दौरे यातुन शेतीयोग्य मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे असे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आनंद ठाकूर यांनी सांगितले.