LIVE UPDATES

चौंडेश्वरी मंदिरात देवीच्या नऊ रूपांची आराधना

नऊ दिवस पूजा, आरती, ग्रंथ पठण आणि गोंधळाचे आयोजन ; भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 10:52 AM
views 57  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : कणकवली येथील चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कोष्टी समाज सेवा संघाच्या वतीने नऊ दिवस देवीची पूजा-अर्चा, आरती, ग्रंथ पठण भजन तसेच देवीसमोर पारंपरिक गोंधळ घालून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची आराधना करण्यात आली. दररोज मंदिरात धार्मिक विधी, पूजा आणि आरती पार पडली. आरती भजनाच्या सुरांनी तसेच देवीच्या गोंधळाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. या धार्मिक सोहळ्यात समाजबांधवांसह बहुसंख्य भक्तगण सहभागी झाले होते.जिल्हा कोष्टी समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित या नवरात्रोत्सवामुळे परिसरात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले. भक्तांनी देवीचे दर्शन घेत श्रद्धापूर्वक पूजा-अर्चा केली.