LIVE UPDATES

Damini Palav Murder Case : दामिनी पालव खून प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती

संशयित साहिल धुरीकडून चाकू आणि वाहन जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 19:29 PM
views 2168  views
Kudal police investigation into the Damini Kiran Palav murder case in Sindhudurg.

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या बहुचर्चित दामिनी किरण पालव खून प्रकरणात कुडाळ पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे. संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी याने दामिनीचा खून करण्यासाठी वापरलेले धारदार हत्यार म्हणजेच चाकू व वाहन पोलिसांनी यशस्वीरीत्या हस्तगत केला आहे. हत्येचे मुख्य हत्यार पोलिसांच्या हाती लागल्याने या गुन्ह्याला भक्कम तांत्रिक पुरावा मिळाला असून, तपासाला अधिक गती आली आहे.

संशयित आरोपी साहिल धुरी याला न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, कुडाळ पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली होती. हत्येनंतर त्याने वापरलेला चाकू कुठे लपवून ठेवला होता, याबाबत पोलिसांनी त्याच्याकडून माहिती वजावून घेतली. अखेर आरोपीच्या निदर्शनानुसार गुन्ह्यात वापरलेला तोच चाकू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्यार हस्तगत झाल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आरोपीविरुद्धचा हा सर्वात भक्कम आणि महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.