LIVE UPDATES

घराचे कुलूप तोडून अतिक्रमण केल्याच्या वादातून मारहाण

कणकवलीत गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 20:31 PM
views 59  views

कणकवली : घराचे कुलूप तोडून घरात अतिक्रमण केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून  माधव सुभाना पाकले (45,-रा.कणकवली भालचंद्रनगर रोड, कणकवली) याने आपणांस धक्काबुक्की केली व पतीस डोळ्याच्या भुवईच्या येथे कपाळावर स्टील ताट मारून दुखापत केली अशी फिर्याद ग्रीष्मा गजानन साट्विलकर (47 रा. कणकवली पटकीदेवी नजीक) यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. याप्रकरणी संशयित माधव पाकले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. त्या पटकीदेवी नजीक घरी असताना एकाने त्यांना भालचंद्र मठाकडील त्यांच्या घराचे कुलूप माधव पाकले याने तोडून आतमध्ये काहीतरी करत असल्याचे सांगितले. या माहितीवरुन ग्रीष्मा या पतीसह तेथे गेल्या. यावेळी त्यांनी माधव यांच्या बहिणीला हाक मारली असता माधव बाहेर आला आणि त्याने ग्रीष्मा यांचा हात पकडून धक्काबुक्की केली. त्यावेळी आपण त्याला ढकलून दिले. त्यावेळी माधव याने आपले पती गजानन साटविलकर यांच्या डोळ्याच्या वर स्टील ताट मारून दुखापत केली असे ग्रीष्मा साट्विलकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस तपास करत आहेत.