LIVE UPDATES

Gokul Election Results : गोकुळच्या सत्तासंग्रामात सतेज पाटील वरचढ

समविचारी आघाडीचे 13, महायुतीचे 12 उमेदवार विजयी : मुश्रीफ गटालाही पराभवाचा धक्का
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 19:13 PM
views 64  views
The Satej Patil-led alliance wins 16 seats in the Gokul election, while Mahayuti secures nine seats.

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महायुतीला धक्का दिला आहे. गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने तसेच सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील पॅनेलने पूर्ण ताकद लावली होती. या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी सतेज पाटील यांच्या पॅनेलला यावेळी साथ दिली. एकूण 25 जागांपैकी 13 जागांवर सतेज पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांचा तर 12 जागांवर महायुतीच्या पॅनेलचा विजय झाला आहे. 

या निवडणुकीत महायुतीने राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी आणि विरोधकांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी नावाने पॅनेल उभे केले होते. समोर आलेल्या निकालानंतर गोकुळवर आता सतेज पाटलांच्याच पॅनेलची सत्ता असणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या कलांमध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलचे 15 उमेदवार आघाडीवर होते. नंतर हा फरक कमी होत गेला. एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटलांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा विजय झाला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या एक पॅनेलची एक जागा कमी झाली. तरीदेखील गोकुळ चालवण्यासाठी जो जादुई आकडा हवा आहे, तो सतेज पाटील यांच्या पॅनेलने गाठला आहे

१. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)

२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)

३. राहुल पांडुरंग पाटील (महायुती) ⁠

४. चेतन अरुण नरके (महायुती)

५. अजित शशिकांत नरके (महायुती)

६. किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)

७. अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)

८. बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)

९. राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)

१०. विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)

११. विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)

१२. मदन बाबुराव देसाई (महायुती)

१३. बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)

१४. राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)

१५. रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)

१६. रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)

१७. अजित पांडुरंग पाटील (महायुती)

१८. कर्णसिह गायकवाड (महायुती )

१९. विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)

२०. अमर पाटील कोडोली (महायुती)

महिला राखीव गट

१. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)

२. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)

इतर मागासवर्गीय गट

१. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)

अनुसूचित जाती गट

१. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)

भटक्या-विमुक्त जमाती गट

१. बयाजी शेळके (सतेज पाटील)

समविचारी आघाडी (सतेज पाटील) – 13 महायुती – 12


ताजी बातमी

View all

सावंतवाडी पोलीस ठाण्यासह तीन ठिकाणी सहा सिमेंट बेंचेस
October 19, 2026
कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सरस्वती विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका
October 19, 2026
सावंतवाडीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६.६६ कोटींचा आराखडा
October 19, 2026
सावंतवाडीत ‘घे भरारी’ फाउंडेशनचा दांडिया रास जल्लोषात
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg administration raises awareness about legal child adoption procedures and child protection guidelines.
Legal Child Adoption Process in India : बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी कायदेशीर दत्तक प्रक्रिया आवश्यक
October 19, 2026
Gokul Dairy election vote counting in Kolhapur as Satej Patil-led panel takes the lead
Gokul Election Results 2026 : गोकुळ निवडणुकीत मोठी उलथापालथ, सतेज पाटील यांच्या आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
October 14, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजार
October 14, 2026