
मुंबई : शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना ऐन सणाच्या तोंडावर आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ५,००० रुपयांची अग्रीम मदत जमा केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली.
प्रक्रियेला वेळ लागणार, पण दिवाळीत दिलासा देणार
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, या सर्व शासकीय प्रक्रियेला काहीसा वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कठीण जाऊ नये, याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन हा तातडीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच ५,००० रुपयांची मदत तात्काळ जमा करण्यात येणार आहे. या निर्णयासाठी राज्य सरकारवर सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all









