
दोडामार्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे, तसेच सासोली आणि पिकुळे येथील तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे लोकार्पण करण्यात आले.
दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीमुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळणार आहेत. तसेच सासोली आणि पिकुळे येथील तलाठी कार्यालयांच्या इमारतींमुळे महसूल विभागाशी संबंधित कामकाजासाठी ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध होतील. या इमारतींच्या लोकार्पणामुळे तालुक्यातील शासकीय सेवांच्या सुविधांमध्ये भर पडली आहे.
या लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिप अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सभापती पार्वती गवस, जि.प सदस्य दीपक गवस, सदस्या साक्षी तळवडेकर, श्वेता धर्णे, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all









