आमदार निलेश राणेंवर आक्षेपार्ह टिप्पणी

उबाठा शाखाप्रमुखाची कुडाळ पोलिसांकडून चौकशी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 16, 2026 20:01 PM
views 18  views

​कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्यावर सोशल मीडियावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख सचिन धुरी यांची कुडाळ पोलिसांनी चौकशी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका डिजिटल वृत्तवाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर आमदार निलेश राणे यांच्याबाबत बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीच्या कमेंट सेक्शनमध्ये 'sachindhuri84' या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. या प्रकारानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी कुडाळ पोलिसांत तक्रार करत संबंधित अकाऊंटधारकावर कारवाईची मागणी केली.
​तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सरूप वाळके, तालुकाप्रमुख सागर वालालकर, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, संदेश सुकळवाडकर, कुमार राठोड यांनी संबंधित शाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला.
​घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी संबंधित शाखाप्रमुखाची या प्रकरणी चौकशी केली. यावेळी तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, कुडाळ तालुका संघटक रोहित भोगटे, चेतन पडते, राजवीर पाटील, प्रसन्ना गंगावणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.