प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 13, 2026 16:35 PM
views 104  views
#kokansadlive#news update#konkan update#

ठाणे : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना (संतोष कनोजिया(41)  आणि अमित सिंग) (34) उत्तर प्रदेशमधून अटक करून ठाण्यात आणण्यात आले. 

सोमवारी त्यांना ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी ही कोठडी मागण्यात आली होती.या घटनेचा संपूर्ण तपास व सुत्रधाराची माहिती याबाबत चौकशी करणे गरजेचे असल्याने या दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर केली.