
कुडाळ : वर्दे येथील दामिनी किरण पालव हिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन सर्वतोपरी प्रयत्न करूया. तिच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी कडावल येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केली. तसेच ही केस फास्ट ट्रॅक चालवून, संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील वर्दे खालची पालववाडी येथील दामिनी किरण पालव या 23 वर्षीय युवतीचा खून झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी वर्दे येथे घडली. या प्रकरणी संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय 22, रा.मठ वेंगुर्ले) याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेनंतर कडावल येथील श्री महापुरुष मंदिरात रविवारी सायंकाळी दामिनी पालव हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच तिला न्याय मिळवून देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्ता सामंत, दादा साईल, संजय पडते, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, जि.प.सदस्य नागेश आईर व दीपलक्ष्मी पडते, पं.स.श्रावणी तेरसे, कडावल सरपंच रश्मी मोरजकर, उपसरपंच स्वरूप वाळके, निरूखे सरपंच किर्तीकुमार तेरसे, भडगाव सरपंच गुणाजी लोट, रिक्षा संघटना अध्यक्ष साई तावडे, व्यापारी संघटना कडावल अध्यक्ष गुरूनाथ मुंज, श्रीकृष्ण शिरोडकर, वर्दे पोलीस पाटील सागर पालव, रविंद्र सावंत, विनायक राणे, राहुल मोरजकर, तुषार परब आदींसह दशक्रोशीतील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सुरूवातीला मयत दामिनी पालव हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








