
कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे 'मान्सून स्पोर्ट्स 2026-27’ या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात व्हॉलीबॉल, डॉज बॉल, रोप स्किपिंग, क्रिकेट, बुद्धिबळ आणि कॅरम अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला.
रोप स्किपिंग मुलींच्या गटात नोलेस्का फर्नांडिस हिने प्रथम, उपासना जाधव हिने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलांच्या गटाण साहिल गावडे व शुभम राणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.कॅरम मुलांच्या गटात मितेश खरवत व कौशिक बोभाटे यांनी प्रथम तर अथर्व कोणकर व स्वप्नील ताटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात दिशा परब व रुपाली चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. क्रिकेटमध्ये FYBScHS संघाने प्रथम क्रमांक, व्हॉलीबॉलमध्ये SYBScHS संघाने प्रथम क्रमांक पटकावला. डॉज बॉलमध्ये मुलींच्या गटात TYBCA संघ विजेता संघ ठरला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








