
कणकवली : भारतीय जनता पार्टी कणकवली शहरातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी बाजार ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकानजीक, ब्रिजखाली होणार आहे. बाजारात बचत गटांचे २५ तर कुंभार समाज बांधवांचे १० असे ३६ स्टॉल्स असणार आहेत. दिवाळी बाजाराचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वा. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. मेघा गांगण यांनी दिली.
येथील समीर समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस श्री. कोदे, सौ. गांगण यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, स्वप्नील राणे, नगरसेविका मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे आदी उपस्थित होते. मेघा गांगण म्हणाल्या, दिवाळी बाजाराचे हे ९ वे वर्ष आहे. गेली ८ वर्षे बाजाराला विक्रेते व ग्राहक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला आहे. त्यामुळे यावर्षी देखील दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी बाजारात महिला बचत गटांनी बनविलेल्या मेणबत्त्या, रांगोळ्या, फराळाचे पदार्थ आदी विक्रीसाठी असणार आहे.
सोबतच कुंभार समाज बांधवांनी मातीपासून बनविलेले कंदील व अन्य साहित्य असणार आहे.अण्णा कोदे म्हणाले, दिवाळी बाजारात स्टॉल लावण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. स्टॉलस्थळी टेबल, खुर्च्या, वीजेची व्यवस्थाही मोफत करण्यात येणार आहे. प्रथम नावनोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य आहे. नाव नोंदणीसाठी अण्णा कोदे (९४२२३८१९००) सौ. मेघा गांगण (९१५२१२०५१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही अण्णा कोदे यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








