
कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी निसर्ग छायाचित्रण स्पर्धा तसेच 'रिलीस पार्क आयडियाज दॅट इन्स्पायर’ या रील निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुण, सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि निसर्ग व सामाजिक विषयांबाबतची जाणीव वाढविणे हा या उपक्रमांचा उद्देश होता.
निसर्ग छायाचित्रण स्पर्धेत निसर्ग, गणेश चतुर्थी, पर्यावरण आणि सर्जनशील क्षण अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक छायाचित्रे सादर केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक साहिल आचरेकर, द्वितीय क्रमांक संचित जाधव, तर तृतीय क्रमांक समर्थ पाटील यांनी मिळविला.तसेच रील्स पार्थ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर रील सादर केल्या. विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या वापराचे दर्शन घडविले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्ष सावंत, द्वितीय क्रमांक चंद्रकांत हिर्लेकर, तर तृतीय क्रमांक तेजस चव्हाण यांनी पटकावला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








