LIVE UPDATES

कै. सुधाताई कामत शाळेत नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 19, 2026 12:32 PM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी :  येथील कै. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक पीएम श्री शाळा सावंतवाडी नंबर २ नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, नगरसेवक देव्या सूर्याजी  नगरसेविका दुलारी रांगणेकर, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष भारती मोरे,  केंद्रप्रमुख श्री. ठाकूर , सुरज परब, सामाजिक कार्यकर्ते नंदू गावडे , आबा केसरकर, माजी केंद्र प्रमुख म. ल. देसाई, यांसह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी आम. केसरकर म्हणाले, सुधाताई कामत शाळेचा सुंदर इमारत लवकरात लवकर उभी करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू, ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या शाळेच्या प्रगतीसाठी जे काही लागेल ते नक्कीच आम्ही करू असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, सुधाताई कामत शाळा नंबर २ ची इमारत बांधण्यात अनेकांचा मौलिक वाटा आहे.

या शाळेच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सहकार्य करू. अनेकदा या शाळेत मी आलो आहे. या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा मला नेहमीच अभिमान वाटतो. गुणवत्ता ही वाखाणण्याजोगे असून या शाळेची उत्तम प्रगती होत आहे.

या शाळेच्या भौतिक सुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इमारत ही दर्जेदार उभी राहणार असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कंत्राटदाराने लवकरात लवकर ही इमारत उभी करून आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी केली. 

जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ म्हणाले, सुधाताई कामत शाळेचा अभिमान  संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातही आहे. या शाळेची गुणवत्ता नेहमीच उत्तम राहिली आहे. लवकरात लवकर ही इमारत उभी राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी देखील मंत्री असताना खूप अभिमानास्पद कार्य केले आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक होण्यासाठी शिक्षण प्रक्रिया खूप महत्वाच्या आहेत. 

पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव म्हणाल्या, आज सावंतवाडी शहरासाठी ऐतिहासिक व सुवर्ण दिवस उजळला आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाची बाब आहे. आपल्याला सुजान नागरिक होण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. सुधाताई कामत शाळेला पंचायत समितीच्या वतीने जे जे सहकार्य लागेल ते सर्व करू असे आश्वासन त्यांनी दिले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कणकवलीत पावणेदोन कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने
October 19, 2026
 DRI and Bihar STF seize 3 kg of charas in Muzaffarpur drug smuggling case
Muzaffarpur Drug Bust : नेपाळमधून महाराष्ट्रात होणार होती ३ कोटींच्या चरसची तस्करी
October 19, 2026
Tiger Shroff firing case accused arrested in Kota Rajasthan
Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात राजस्थानमधून तिन्ही आरोपींना अटक
October 19, 2026
Smriti Mandhana and Shafali Verma during India Women vs Zimbabwe Women T20I match
Smriti Mandhana and Shafali Verma Record : स्मृती-शेफालीचा ऐतिहासिक विक्रम! एका वर्षात १,०८३ धावांची भागीदारी
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कणकवलीत पावणेदोन कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ प्रथम
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
भाजपतर्फे कणकवलीत दिवाळी बाजाराचे आयोजन
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
रिगल कॉलेजमध्ये निसर्ग छायाचित्रण व ‘रील स्पार्क’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 19, 2026