LIVE UPDATES

Smriti Mandhana and Shafali Verma Record : स्मृती-शेफालीचा ऐतिहासिक विक्रम! एका वर्षात १,०८३ धावांची भागीदारी

भारताची मालिकेत २-० अशी आघाडी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 13:03 PM
views 38  views
Smriti Mandhana and Shafali Verma during India Women vs Zimbabwe Women T20I match

रायपूर : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० सिरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. रविवारी रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ९ गडी राखून विजय मिळवला.

झिम्बाब्वेने विजयासाठी १०३ धावांचे लक्ष्य दिले होते. हे भारतीय संघाने अवघ्या ८.५ षटकांत पूर्ण केले. मानधना आणि शफाली वर्मा यांनी सलामीला ९६ धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात शफाली बाद झाल्याने ही भागीदारी संपली. तिने २५ चेंडूंत ५५ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. मानधना २५ चेंडूंत ४५ धावा करून नाबाद राहिली, तिने ६ चौकार आणि २ षटकार मारले. दरम्यान मानधना आणि शफाली यांना शतकी भागीदारी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी या जोडीने इतिहास रचला आहे.

मानधना आणि शफाली या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात १,००० भागीदारी धावा पूर्ण करणारी पहिली जोडी ठरली आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत या जोडीने २३ टी-२० डावांमध्ये एकूण १,०८३ धावा केल्या आहेत. याआधी, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक भागीदारी धावांचा विक्रम संयुक्त अरब अमिरातीच्या ईशा ओझा आणि तीर्थ सतीश यांच्या नावावर होता. यांनी २०२५ मध्ये २१ डावांत ९४३ धावा केल्या होत्या.

मानधना आणि शफाली यांनी यावर्षी ९ वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही जोडीद्वारे केलेली ही सर्वाधिक ५० अधिक धावांची भागीदारी आहे. यापूर्वी, हाँगकाँगच्या यास्मिन दसवाणी आणि नताशा माइल्स यांनी २०२६ मध्ये आठ वेळा ५० अधिक धावांची भागीदारी केली होती.  

झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर कर्णधार स्मृती मानधनाने आपल्या गोलंदाजांचे आणि युवा सलामीवीर शफालीच्या फलंदाजीचे कौतुक केले. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला आठ गडी गमावून केवळ १०२ धावांवर रोखले. भारताकडून निक्की प्रसादने दोन बळी घेतले, तर क्रांती गौड, नंदनी शर्मा, दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. 

सामन्यानंतर बोलताना मानधना म्हणाली, "पहिल्या सामन्याच्या तुलनेत गोलंदाजांनी अधिक चांगली कामगिरी केली. त्यांनी नियोजनानुसार गोलंदाजी केली. शेफाली अतिशय आक्रमक फलंदाजी करत होती, म्हणून मी तिला वारंवार स्ट्राईक दिली आणि संधी मिळताच तिने आपले फटके खेळले." शेफालीला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून घोषित करण्यात आले. तिने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले २२ वे अर्धशतकही पूर्ण केले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
कणकवलीत पावणेदोन कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने
October 19, 2026
 DRI and Bihar STF seize 3 kg of charas in Muzaffarpur drug smuggling case
Muzaffarpur Drug Bust : नेपाळमधून महाराष्ट्रात होणार होती ३ कोटींच्या चरसची तस्करी
October 19, 2026
Tiger Shroff firing case accused arrested in Kota Rajasthan
Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात राजस्थानमधून तिन्ही आरोपींना अटक
October 19, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ प्रथम
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

 India vs West Indies fifth T20 international match preview at M Chinnaswamy Stadium in Bengaluru
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी भारत-वेस्ट इंडिज संघ आज आमनेसामने
October 17, 2026
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश
October 15, 2026
तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालयाचे घवघवीत यश
October 15, 2026
मदर क्वीन्स स्कूलच्या रोहन घावरेची विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड
October 15, 2026