LIVE UPDATES

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 18:40 PM
views 48  views

सावंतवाडी : थाळीफेक व गोळाफेक स्पर्धेत कु. अस्मी सावंत आणि कु. अनिका सुकी यांची उल्लेखनीय कामगिरी दर्शवली. तालुकास्तरीय शालेय मैदानी (अथलेटिक्स) स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रशालेचा नावलौकिक वाढवला. 

१४ वर्षे वयोगटातील या स्पर्धेत प्रशालेचे एकूण सात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी इयत्ता ८ वी मधील कु. अस्मी सावंत व इयत्ता ६ वी मधील कु. अनिका सुकी यांनी थाळीफेक आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारांत यश संपादन करत आपले क्रीडाकौशल्य सिद्ध केले. या स्पर्धेत कु. अस्मी सावंत हिने थाळीफेक प्रकारात १६.८७ मीटर अंतरावर थाळी फेकून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कु. अनिका सुकी हिने गोळाफेक प्रकारात ६.६० मीटर अंतरावर गोळा फेकून द्वितीय क्रमांक व थाळीफेक प्रकारात १५.४० मीटर अंतरावर थाळी फेकून तृतीय क्रमांक मिळवला.

दोन्ही विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, सरावाचे आणि क्रीडाक्षेत्रातील जिद्दीचे प्रतीक आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे प्रशिक्षक प्रा‌. शैलेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी कु. अस्मी सावंत आणि कु. अनिका सुकी यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील क्रीडावाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


ताजी बातमी

View all

आई-वडीलांच्या स्मरणार्थ जि.प. शाळेला 'स्मार्ट टीव्ही'
October 17, 2026
सावंतवाडीतील शहरातील रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवणार ?
October 17, 2026
पडक्या विहिरी पुनरुज्जीवित करा
October 17, 2026
आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून नेरूर ओहोळातील गाळ उपसा यशस्वी
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

 India vs West Indies fifth T20 international match preview at M Chinnaswamy Stadium in Bengaluru
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी भारत-वेस्ट इंडिज संघ आज आमनेसामने
October 17, 2026
तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालयाचे घवघवीत यश
October 15, 2026
मदर क्वीन्स स्कूलच्या रोहन घावरेची विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड
October 15, 2026
Indian cricket team achieves 2000 sixes milestone in T20 International cricket
पराभवानंतरही भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम
October 15, 2026