LIVE UPDATES

पडक्या विहिरी पुनरुज्जीवित करा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 17:15 PM
views 25  views

देवगड : यंदा पर्जन्यमानात झालेली घट आणि आगामी काळात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता ग्रामीण भागातील दुर्लक्षित व पडक्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांना पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जुन्या आणि दुर्लक्षित विहिरी असून, त्यांची अनेक वर्षांपासून योग्य देखभाल व स्वच्छता झालेली नाही. मात्र, यातील काही विहिरींमध्ये आजही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. या जलस्रोतांचा योग्य वापर केल्यास संभाव्य पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागाला दिलासा मिळू शकतो.

सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांत विहिरींचे सर्वेक्षण करा

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांमधील दुर्लक्षित विहिरींचे सर्वेक्षण करून पाणीसाठा उपलब्ध असलेल्या आणि वापरासाठी योग्य ठरू शकणाऱ्या विहिरींची यादी तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून या विहिरींची माहिती संकलित करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.


ताजी बातमी

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
October 17, 2026