LIVE UPDATES

कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 17:47 PM
views 18  views

सावंतवाडी : वाचन संस्कृती आज कमी होत चालली आहे. प्रत्येक पालक आणि मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल आला आहे. अशा स्थितीत गावातील मराठी शाळा आणि वाचन मंदिरे टिकणार कशी ? त्यासाठी पालकांनीच आता आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून थोडा वेळ ज्ञानेश्वरी तसेच इतिहासकालीन पुस्तके पुन्हा चाळायला घ्यावी. तेव्हाच पाल्य आपसूकच वाचन संस्कृतीकडे वळतील. आज MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञान युगात पुस्तक चाळणे फार महत्त्वाचे आहे.या धर्तीवर कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या वतीने अभ्यासक्रम, पुस्तके, मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी स्पष्ट केले.

कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कलंबिस्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या वतीने वाचक प्रेरणा दिन व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वाचाल तर वाचाल हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री देवी सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर गावच्या सरपंच सपना सावंत, ज्ञानमंदिर वाचनालयाचे नूतन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, माजी पंचायत समिती सदस्य तथा संचालक रमेश सावंत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा संचालिका मीनल जंगम, संचालक सखाराम उर्फ बाबू सावंत, अनिल उर्फ भाई सावंत, सिद्धेश सावंत, बाळा राजगे, माजी सरपंच बाळू सावंत, माजी सैनिक सगणु पास्ते, पांडुरंग सावंत, बाळा सावंत, कवी रवींद्र तावडे, शिक्षिका श्वेता सावंत, विनायक शिरसाट, ग्रंथपाल कविता जाधव, दीपा श्री जाधव, किशोर वालावलकर, रवी कमल सावंत, अंगणवाडी सेविका सौ. बिडये, सौ. पवार आदी पालक शिक्षक उपस्थित होते.

यावेळी वाचक प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम तसेच इतर पुस्तकांचे वाचन केले. यावेळी स्वानंद पावसकर, जीविका सावंत, ऋतिका सावंत, सौरभ कलंबिस्तकर या विद्यार्थ्यांनी विविध गोष्टी तसेच शास्त्रज्ञ यांची पुस्तकांचे वाचन केले. यावेळी जयसिंग देसाई यांनी अंगणवाडीतील मुलांना पुस्तक तसेच शैक्षणिक साहित्य दिले, त्याचे वितरण करण्यात आले. तर माजी विद्यार्थी रवींद्र तावडे व रवी कमल सावंत यांच्या हस्ते शाळेला भौतिक गरज असलेल्या वस्तूंचे किट शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेडगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी पुस्तक वाचावे यासाठी पुस्तक संच उपलब्ध करून देण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक अभिजीत जाधव म्हणाले, आज अनेक गावात घरामध्ये पूर्वीसारखी गजबज नाही, शहरी भागाकडे ओढ वाढला आहे. याचे कारण रोजगार, नोकरीसाठी मोठ्या शहरात गावातील मंडळी जात आहेत आणि त्यामुळेच गावातील मराठी शाळेची पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गावच्या पंचक्रोशीत रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तर गाव पूर्वीसारखे गजबजेल आणि शाळाही टिकतील.

यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे म्हणाले, जिल्हा परिषदच्या मराठी शाळांमध्ये शिकूनच आज अनेकजण उच्चस्तरीय पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे मराठी शाळांमध्येच पालकांचा ओढा वाढला आहे. पण मराठी शाळांमधील भौतिक प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकसंघ काम करायला हवे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रेया शरद सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते


ताजी बातमी

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
आई-वडीलांच्या स्मरणार्थ जि.प. शाळेला 'स्मार्ट टीव्ही'
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
आई-वडीलांच्या स्मरणार्थ जि.प. शाळेला 'स्मार्ट टीव्ही'
October 17, 2026