LIVE UPDATES

सावंतवाडीतील शहरातील रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवणार ?

कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारींचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 17:29 PM
views 32  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे रस्त्यांची कामे करता येत नाहीत, निधी मंजूर असूनही कामे रखडली आहेत, अशी कारणे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार दिली जातात. पण, आता ऑक्टोबर महिना सुरू आहे. पावसाने दडी मारली असून कडक ऊन पडत आहे. मग, आता रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे सुरू होणार आहेत की पुन्हा नवीन कारणे सांगितली जाणार ? असा सवाल कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केला आहे.

एक दिवस एसी गाडीतून बाहेर पडा आणि टू-व्हीलरवरून सावंतवाडी शहराचा प्रवास करून पाहा असे आव्हान त्यांनी सत्ताधारी लोकांना दिले आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनी शहरातील २० प्रभागांमध्ये दुचाकीवरून फेरफटका मारावा असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

खड्ड्यांमधून वाट काढताना सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. पायी चालणारे नागरिक, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दररोज होणारा मनस्ताप एकदा समजून घ्यावा. एसी गाडीत बसून विकासाच्या गप्पा मारणे सोपे आहे. पण रस्त्यावर उतरून जनतेच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे. त्यामुळे रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करावी. जनतेला आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम हवे अशी टीका त्यांनी केली आहे.


ताजी बातमी

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
October 17, 2026