
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून, दुपारी ३.३६ वाजता प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पॅनेलचे १४ उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनेलसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
क्रॉस व्होटिंगमुळे निकालात चुरस
गोकुळच्या २५ संचालकपदांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतदानात ५,४१६ पैकी ५,४१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ९९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती; मात्र पुढील फेऱ्यांमध्ये सतेज पाटील यांच्या आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली.
महायुतीच्या दिग्गजांना फटका?
मतमोजणीदरम्यान गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह महायुतीतील काही दिग्गज उमेदवार पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अंतिम निकाल आणि विजयी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होणे बाकी असल्याने मतमोजणीच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








