LIVE UPDATES

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सरस्वती विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका

शारदोत्सवाची उत्साहात सांगता
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 20:20 PM
views 20  views

सावंतवाडी : 'कळसुलकर इंग्लिश स्कूल'मध्ये शारदोत्सवा निमित्ताने पूजन करण्यात आलेल्या श्री सरस्वती देवीच्या मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडले. या विसर्जन मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम पथक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी विशेष लक्ष वेधून घेतले.

मिरवणुकीची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणातून झाली. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक लेझीमाचे लयबद्ध ठोके आणि विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग यामुळे संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता. विद्यार्थी वर्गाच्या विविध लोकनृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाने विसर्जन मिरवणुकीत विशेष रंग भरला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी उशीरा मोती तलाव येथे देवी सरस्वतीचे विसर्जन करण्यात आले.