LIVE UPDATES

एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिची हत्या

संशयित आरोपी साहिल धुरी याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 18, 2026 17:17 PM
views 205  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात खळबळ उडवून देणारी धक्कादायक घटना समोर आली होती. एकतर्फी प्रेम प्रकरणातून दामिनी पालव या तरुणीची हत्या करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल धुरी याला पोलिसांनी पहाटे ४ वाजता वेंगुर्ला मठ येथे ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कलम १०३/१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज दुपारी ३:३० च्या सुमारास संशयित आरोपीला कुडाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची माहिती देताना कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले की, "प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीला अटक करून न्यायालयात सादर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे." या खुनात आणि कोणाचा सहभाग होता का याचा व खुनात वापरलेल्या हत्याराचा शोध पोलीस घेत आहे.