LIVE UPDATES

नदीपात्रात आढळला ज्येष्ठाचा मृतदेह

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 18, 2026 20:32 PM
views 29  views

कणकवली : तालुक्यातील नाटळ-दुबळेश्वरवाडी येथील प्रकाश राघो गावकर (५२) यांचा कुंभवडे-तावडेची कोंड येथील मल्हार नदीपात्रात पाण्यात अर्धवट बुडालेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश गावकर हे शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कुंभवडे-तावडेची कोंड येथील मल्हार नदीपात्रात गेले होते. यावेळी ते नदीच्या पाण्यात पालथ्या स्थितीत अर्धवट बुडालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती विशाल राजाराम गावकर (२८, रा. नाटळ- दुबळेश्वरवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.