LIVE UPDATES

संजू परब यांनी घेतलं सांगेली, माडखोल - माजगावातील नवदुर्गांचं दर्शन

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 18, 2026 20:12 PM
views 29  views

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथील नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत उपतालुकाप्रमुख राकेश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सांगेली गावचे माजी सरपंच वामन नार्वेकर, माजी सरपंच रमाकांत राऊळ, दीपक सांगेलकर, संतोष नार्वेकर, माडखोल गावचे उपसरपंच जीजी राऊळ, राजन राऊ, वासुदेव होडावडेकर, ॲड.सुरेश आडेलकर त्याच प्रमाणे मंदिराचे प्रमुख गावकर व मानकरी तसेच माजगाव येथील रूपेश नाटेकर, राजू कुबल, दिनेश सावंत,संजय माजगावकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.