
कुडाळ : शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी मयत दामिनी पालव हिच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक (जलदगती) कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजात योग्य संदेश व वचक बसण्यासाठी या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल, असा ठाम निर्धार शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी दत्ता सामंत यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक,संजय पडते, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, पंचायत समिती सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या श्रावणी तेरसे, घनश्याम तेरसे, कीर्तिकुमार तेरसे, स्वरूप वाळके, काका कुडाळकर, विनायक राणे, सागर पालव, वर्देचे पोलिस पाटील तसेच कडावल-वर्दे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








