
सावंतवाडी : बाहेरचावाडा, कोलगाव दरवाजाजवळ फिर्यादीच्या मालकीच्या दुकानगाळ्याचे कुलूप परस्पर कापून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी दयानंद देवराम केनवडेकर (वय ७३, रा. बाहेरचावाडा, कोलगाव दरवाज्याजवळ, सावंतवाडी) यांच्या घरालगत असलेल्या २५८ बी या दुकानगाळ्याला फिर्यादी यांनी कुलूप लावले होते.
आरोपी इम्रान नजीर बेग (वय ४०, रा. झिरंगवाडी, सावंतवाडी) याने फिर्यादीच्या संमतीशिवाय दुकानगाळ्याचे कुलूप कापून आतमध्ये अनधिकृत प्रवेश केला आणि कुलूप तोडून नुकसान केले. या प्रकरणी फिर्यादी दयानंद केनवडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








