LIVE UPDATES

२०२७-२८ पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खर्च मोफत

तळवडे नं. ३ शाळेचं कौतुकास्पद पाऊल
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 18, 2026 20:28 PM
views 86  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नं. ३ ने एक कौतुकास्पद पाऊल टाकलं आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांनी अनोखा निर्धार करत २०२७-२८ पासून नव्याने प्रवेश घेणाऱ्या व शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खर्च मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासकीय परिक्षा, एसटीएस, बीडीएस, जीटीएस आदी परिक्षांचा यात समावेश असणार असून सर्व प्रकारच्या परिक्षांचा खर्च आजी-माजी विद्यार्थी संघ करणार आहे. २०१९ ते २०२२ सलग तीन वर्ष शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या शाळेतून उत्तीर्ण झाले आहे. कोरोना काळात परंपरा खंडीत होती. मात्र, २०२५-२६ ला शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमक दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी शाळेकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा वाढावा यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांनी परिक्षेचा खर्च करण्याचा निर्धार केला आहे.