
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी ६ पथके तैनात केली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय.
सायंकाळी घराकडे जात असताना वाटेत अज्ञात हल्लेखोराने तिला अडवून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू करण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all












