LIVE UPDATES

नवरात्रोत्सवानिमित्त तुळसमध्ये रविवारी श्री दुर्गामाता दौड, हळदीकुंकू समारंभ

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तुळस यांच्यावतीने धार्मिक उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 13:56 PM
views 7  views

वेंगुर्ला : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तुळस यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन रविवार, १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. आश्विन शुद्ध सप्तमीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी ४ वाजता श्री रामेश्वर मंदिर, तुळस येथून या दौडीला प्रारंभ होणार आहे. या धार्मिक उपक्रमात सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या दौडीचा मार्ग श्री देवी सातेरी मंदिर, सिद्धार्थनगर, तुळस बाजारपेठ, श्री जैतिर मंदिर आणि पुन्हा श्री रामेश्वर मंदिर असा असणार आहे. दुर्गामाता दौड ही पायी फेरी असल्याने भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शक्य असल्यास महिलांनी नऊवारी साडी, तर पुरुषांनी वारकरी टोपी व सदरा परिधान करून सहभागी व्हावे. तसेच भगवा किंवा भगव्या रंगाला मिळतीजुळती वस्त्रे परिधान करून धार्मिक वातावरणात या दौडीत सहभागी व्हावे, असे आयोजकांनी सूचित केले आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता श्री रामेश्वर मंदिर, तुळस येथे हळदीकुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची आणि धार्मिक परंपरा जपण्याची संधी मिळणार आहे.

धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही उपक्रमांना ग्रामस्थ, महिला, युवक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

अर्जुन रावराणे विद्यालयात सरस्वती पूजन उत्साहात
October 17, 2026
चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
October 17, 2026
दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र, भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात
October 17, 2026
संत समाज दोडामार्गच्यावतीने आंबेली येथे सामूहिक कुंकुमार्चन
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

अर्जुन रावराणे विद्यालयात सरस्वती पूजन उत्साहात
October 17, 2026
चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
October 17, 2026
दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र, भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात
October 17, 2026
संत समाज दोडामार्गच्यावतीने आंबेली येथे सामूहिक कुंकुमार्चन
October 17, 2026