LIVE UPDATES

अर्जुन रावराणे विद्यालयात सरस्वती पूजन उत्साहात

कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पूजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 14:56 PM
views 19  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था, मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सरस्वती पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे विधिवत पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक वारकरी भजनांमुळे शाळा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

आज देशभर सरस्वती पूजनाचा माहोल आहे.तालुक्यातील रावराणे शिक्षण संकुलातही हा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वतीचे पूजन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी भजने सादर केली. सामूहिक आरतीतून विद्यार्थ्यांनी माता सरस्वतीप्रती श्रद्धा व्यक्त केली. वारकरी परंपरा आणि शैक्षणिक संस्कारांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून साधला गेला. या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

‘दृश्यम ३’ पाहून आखला हत्येचा कट, वाढदिवसाचा खर्च अन् बाईकसाठी मित्राचाच घेतला जीव
October 17, 2026
‘बोर्ड परीक्षा बागुलबुवा नव्हे, क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी’
October 17, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त तुळसमध्ये रविवारी श्री दुर्गामाता दौड, हळदीकुंकू समारंभ
October 17, 2026
चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

‘बोर्ड परीक्षा बागुलबुवा नव्हे, क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी’
October 17, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त तुळसमध्ये रविवारी श्री दुर्गामाता दौड, हळदीकुंकू समारंभ
October 17, 2026
चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
October 17, 2026
दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र, भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात
October 17, 2026