
सावंतवाडी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथील स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा अभियाना अंतर्गत बंधारा बांधून जलसंवर्धनाचा अनमोल संदेश दिला. भविष्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचे महत्त्व ओळखून पावसाचे पाणी अडवणे, त्याचा योग्य वापर करणे आणि जलसाठा वाढवणे याबाबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती केली.
पाण्याची बचत ही काळाची गरज असून, जलसंधारणाच्या माध्यमातून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते, हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, शालेय शिक्षणासोबतच सामाजिक आणि पर्यावरणविषयक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी निरवडे गावच्या सरपंच श्रीमती सुहानी गावडे, व सहकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर, समन्वयक अजय बांदेकर, सहाय्यक शिक्षक मनीष सावंत, योगेश येरम, साईश तारी आणि विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेऊन बंधारा बांधण्याचे काम पूर्ण केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








