LIVE UPDATES

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे

Edited by:
Published on: October 17, 2026 13:19 PM
views 26  views

दोडामार्ग : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे घालण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि तळकट ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमासाठी सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, ग्रामसेवक तळकट, वनपाल किशोर वि. जंगले (खडपडे), वनरक्षक सचिन पवार, वनरक्षक सुबोध नाईक (केर), वनसेवक बाळकृष्ण सावंत (तळकट वनबाग) आणि मदतनीस तुषार वामन देसाई (केर) यांनी पुढाकार घेतला. या कामासाठी तळकट ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अधिक काळ साठून राहण्यास मदत होणार आहे. परिणामी, वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यासोबतच परिसरातील भूजलपातळी वाढविणे व टिकवून ठेवणे यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धन आणि गावातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ताजी बातमी

View all

नवरात्रोत्सवानिमित्त तुळसमध्ये रविवारी श्री दुर्गामाता दौड, हळदीकुंकू समारंभ
October 17, 2026
चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
October 17, 2026
दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र, भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात
October 17, 2026
संत समाज दोडामार्गच्यावतीने आंबेली येथे सामूहिक कुंकुमार्चन
October 17, 2026
संबंधित बातम्या