
देवगड : दरवर्षी घटस्थापनेपासून दाभोळे गावांत श्री देव गांगेवश्वर, पावणाई, भावई मंदिरात दाभोळे वरचीवाडी, मधली वाडीचे सिमोलंघना पर्यंत दहा दिवस कार्यक्रम असतात. या वर्षी श्री पावणाई प्रासादिक भजन व नाटयमंडळ दाभोळेच्या कलाकारांनी प्रेक्षकांना खीळवून ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभारला.
श्री. पावणाई प्रासादिक भजन व नाटयमंडळ दाभोळेच्या ग्रामीण कलाकारांनी आपली दैनंदिन शेतीची कामे करत आपल्या कलाकृतींनाही जोपासले आहे. पाचव्या माळेला शिव तेज नेताजी ही कलाकृती सादर करत उपस्थित प्रेक्षकांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. यामध्ये दिलेरखान-सचिन घाडी, दौलत-सुनिल घाडी, मिर्झाराजे-संदिप घाडी, उदाजी-संतोष घाडी,विश्वास-संदेश घाडी, टिकोजी -अभिजीत घाडी, नवसाजी-अमित घाडी आणि शिवाजी -भिवा घाडी यांनी उत्तम वेशभूषा आणि अभिनय करत प्रेक्षकांची मने रिजवली. यामुळे आता देवगड तालुक्यातील प्रेंक्षक वर्गाचे नवव्यामाळेच्या चारित्र्याचा संघर्ष या सामाजीक नाटयाकडे लक्ष लागून राहिले आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all









