LIVE UPDATES

देवगडच्या ‘डॉपिंग टू गेदर’ एकांकिकेने राज्यस्तरीय स्पर्धेत मारली बाजी

मातोंड मध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजन : ठाण्याची ‘लागली’ द्वितीय, तर देवगडची ‘लगोरी’ तृतीय
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 12:43 PM
views 24  views

वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड येथे समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी व श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘जागर आदिशक्तीचा नवरात्रोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत नाट्यसंस्कार देवगडच्या ‘डॉपिंग टू गेदर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. एनकेटी ठाणावाला स्वायत्त ग्रुपच्या ‘लागली’ या एकांकिकेला द्वितीय, तर युथ फोरम देवगडच्या ‘लगोरी’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कोकणातील नाट्यपरंपरेला नवी ऊर्जा देणाऱ्या या स्पर्धेत कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची मने जिंकली.

१३ व १४ ऑक्टोबर असे दोन दिवस या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन १३ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा पर्यटन व उद्यान सभापती आणि मातोंड गावच्या सुकन्या मोहिनी मडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मातोंडच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर, प्रमुख गावकर तथा माजी सरपंच उदय परब, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, सावंतवाडी महिला सरचिटणीस मेघना साळगावकर, गिरीश मेडिकलचे मालक प्रसाद गुरव, अंबिका बेकर्सचे मालक सुधीर मातोंडकर, सिने-नाट्य अभिनेते व परीक्षक अभय खडपकर, नाट्य अभिनेते तथा कलावलय संस्थेचे सचिव संजय पुनाळेकर यांच्यासह श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच या स्पर्धेत कोल्हापूरच्या 'साडेतीन हाताचा हिशोब' आणि रत्नागिरी लांजा येथील कलरंग थिएटरसच्या 'नाडा' या एकांकिकाना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत विविध नाट्यसंस्थांच्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून वेगवेगळे विषय प्रभावीपणे सादर केले. एकांकिकांमधील आशय, सादरीकरण, संवादफेक आणि कलाकारांच्या अभिनयाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण सिने-नाट्य अभिनेते अभय खडपकर आणि संजय पुनाळेकर यांनी केले. 

या स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच मयुरी वडाचेपाटकर, निवृत्त मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर, माजी उपसरपंच नितीन परब, देवस्थानचे गावकर रविकिरण परब, विजय परब, पोलीस पाटील सागर परब, ग्रा प सदस्य तथा पत्रकार दिपेश परब, पत्रकार महेंद्र मातोंडकर, गिरीष मेडिकलचे प्रसाद गुरव, सौ गुरव, आरती परब उपस्थित होते. तसेच श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी महेश पाटकर, गायेश परब, देवेश परब, देवेंद्र परब, बाजा परब, दर्शन परब यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी व नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे निवेदन पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी केले. 

मातोंड येथे धार्मिक कार्यक्रमांसोबतच अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून ग्रामीण भागातील नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष ठरला. श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली. कलाकार, परीक्षक, मान्यवर आणि रसिकांच्या सहभागामुळे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 


ताजी बातमी

View all

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे
October 17, 2026
मिलाग्रीस हायस्कूलच्या स्काऊट-गाईड व इको क्लब विद्यार्थ्यांचे श्रमदान
October 17, 2026
संस्कार नॅशनल स्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा बांधत जलसंवर्धनाचा संदेश
October 17, 2026
सावंतवाडी ‘सिंधूशक्ती युवती संमेलन’ उत्साहात
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे
October 17, 2026
मिलाग्रीस हायस्कूलच्या स्काऊट-गाईड व इको क्लब विद्यार्थ्यांचे श्रमदान
October 17, 2026
संस्कार नॅशनल स्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा बांधत जलसंवर्धनाचा संदेश
October 17, 2026
सावंतवाडी ‘सिंधूशक्ती युवती संमेलन’ उत्साहात
October 17, 2026