LIVE UPDATES

कणकवली नगरपंचायतीच्या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांचे रक्तदान

मुख्याधिकारी , नगरसेवकांनी केले रक्तदान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 17, 2026 10:30 AM
views 55  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

 कणकवली :  नगरपंचायत, कणकवली येथे ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच नगरपंचायतीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात स्वतः मुख्य अधिकारी गौरी पाटील यांनी देखील रक्तदान केले  या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष  संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक  संकेत नाईक,  राधाकृष्ण नार्वेकर, लुकेश कांबळे, नगरसेविका  जाई मुरकर, दीपिका जाधव आणि प्रशासकीय अधिकारी  अमोल अघम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी  प्रशांत राणे, अक्षता रोळे, सतीश कांबळे, अमोल भोगले, ध्वजा उचले, निकीता पाटकर, मनोज तोरस्कर, सूरज शिवगण, संतोष पाताडे, संदीप उबळकर, राजेश राणे, सुमित कुबल, माधुरी डगरे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग कणकवली तालुका सचिव सुशील परब, नवजीवन ब्लड बँकेच्या सुप्रिया पवार, ऋषिकेश कोरडे, इतर नगरपंचायत कर्मचारी, ब्लड बँकेचे कर्मचारी आणि रक्तदाते उपस्थित होते.

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

 या शिबिरादरम्यान नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक संजय कामतेकर,  संकेत नाईक आणि  राकेश राणे व नगरपंचायत कर्मचारी यांनी  स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या या सहभागामुळे इतर रक्तदात्यांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहन मिळाले.

 रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नगरपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजहिताचा संदेश देण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. 


ताजी बातमी

View all

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे
October 17, 2026
मिलाग्रीस हायस्कूलच्या स्काऊट-गाईड व इको क्लब विद्यार्थ्यांचे श्रमदान
October 17, 2026
संस्कार नॅशनल स्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा बांधत जलसंवर्धनाचा संदेश
October 17, 2026
सावंतवाडी ‘सिंधूशक्ती युवती संमेलन’ उत्साहात
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत तळकट वनबाग येथे वनराई बंधारे
October 17, 2026
मिलाग्रीस हायस्कूलच्या स्काऊट-गाईड व इको क्लब विद्यार्थ्यांचे श्रमदान
October 17, 2026
संस्कार नॅशनल स्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा बांधत जलसंवर्धनाचा संदेश
October 17, 2026
सावंतवाडी ‘सिंधूशक्ती युवती संमेलन’ उत्साहात
October 17, 2026