LIVE UPDATES

इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी

विविध पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 11:12 AM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

नवी दिल्ली : इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात (SDSC SHAR) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, एमटीएस आणि ड्रायव्हर यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महत्त्वाच्या अटी व पात्रता :

तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयात डिप्लोमा किंवा बी.एससी. पदवी असणे आवश्यक आहे, तर एमटीएस आणि ड्रायव्हर पदांसाठी किमान १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे (नियमांनुसार सवलत लागू).

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड बहुपर्यायी स्वरूपाच्या लेखी परीक्षेच्या आधारावर आणि त्यानंतर होणाऱ्या कौशल्य चाचणीद्वारे (Skill Test) केली जाईल.

अर्ज कसा करावा:

पात्र उमेदवारांना shar.gov.in किंवा apps.shar.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत ०९ नोव्हेंबर २०२६ आहे.