US Hindu Temple Attack Plot : हिंदू मंदिरांवर हल्ल्याचा कट उधळला

भारतीयांना लक्ष्य करण्याच्या आरोपाखाली १९ वर्षीय तरुणाला अटक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 13:35 PM
views 112  views

शिकागो : अमेरिकेतील एका हिंदू मंदिराला आणि भारतीय समुदायाला लक्ष्य करण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॅलाटाईन (Palatine) येथे राहणाऱ्या १९ वर्षीय अलेक्झांड्रोस पॅपोराकिस (Alexandros Paporakis) याला अटक केली आहे. त्याने मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची योजना आखली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पॅपोराकिसचे नेमके इरादे काय होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांच्या मते, पॅपोराकिसचा उद्देश ऑरोरा (Aurora) येथील एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा असावा. दरम्यान, त्याने नेमक्या कोणत्या ठिकाणाला लक्ष्य करण्याचे ठरवले होते याचा तपास अजूनही सुरू आहे. पॅपोराकिससोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा कट उघड झाला. त्याने आपल्या सहकाऱ्यांना काही मॅसेज पाठवले होते. या मॅसेजमध्ये हल्ल्याच्या योजनेचे डिटेल्स आणि शस्त्रास्त्रांचे फोटो होते. हे मॅसेज पाहून त्यांच्या संशय आला.

हिंदू धर्मीय नवरात्रीसारखे सण साजरे करत आहेत. अशातच ही अटकेची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी ओहायोमधील रिचमंड हाईट्स येथील 'श्री स्वामीनारायण वडताल धाम' हिंदू मंदिरात तोडफोडीची घटना घडली होती. तपासकर्त्यांच्या माहितीनुसार, पॅपोराकिसने एक डॉक्युमेंट शेअर केला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्याची योजना नमूद केली होती.

मीडियामधील अहवालांनुसार, त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, पॅपोराकिस स्वतःला 'व्हाईट सुप्रीमासिस्ट' म्हणजेच 'गोऱ्या वंशाचे लोक इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत' असे म्हणवून घेत असे. त्याने असेही म्हटले होते की, भारतीयांना मारण्यासाठी तो आता अधिक वाट पाहू शकत नाही. असे समजते की, त्याच्याकडील बंदुकीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो आपली योजना पूर्ण करू शकला नाही आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.


ताजी बातमी

View all

सावंतवाडीत बिहारी कामगाराचा संशयास्पद मृत्यू
October 16, 2026
पालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडीतील नवदुर्गेचे घेतले दर्शन
October 16, 2026
दोडामार्ग तालुक्यात शासकीय सुविधांना बळ
October 16, 2026
आमदार निलेश राणेंवर आक्षेपार्ह टिप्पणी
October 16, 2026
संबंधित बातम्या

View all

Supreme Court of India ruling on backward class reservation after conversion to Islam
Supreme Court judgment : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! धर्मांतर केल्यास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही
October 15, 2026
Central government approves 78-day Productivity Linked Bonus for eligible Indian Railways employees
Railway employees bonus 2026 : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ११.४० लाख कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस मंजूर
October 14, 2026
2026 Hero Xtreme 160R 4V motorcycle with updated styling
हिरो एक्सट्रीम 160 आर 4 व्हीचे नवे मॉडेल 'या' तारखेला होणार लॉन्च, काय असेल खास? वाचा सविस्तर
October 14, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
युपीआय व्यवहारांवरील शुल्क आकारणी दिवाळीपर्यंत लांबणीवर
October 13, 2026