युपीआय व्यवहारांवरील शुल्क आकारणी दिवाळीपर्यंत लांबणीवर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 13, 2026 16:05 PM
views 159  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुंबई : सणासुदीचा काळ आणि ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता, युपीआय (UPI) द्वारे व्यवहार स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या (NPCI) 'UPI आणि सेवा सुकाणू समिती'ने काही विशिष्ट व्यापारी व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' (MDR) लागू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरपर्यंत पुढे ढकलला आहे.

सामान्यांना कोणताही भुर्दंड नाही

एनपीसीआयने स्पष्ट केले आहे की, हा MDR नियम केवळ काही विशिष्ट व्यापारी व्यवहारांसाठी लागू असणार असून, सामान्य नागरिकांकडून दैनंदिन व्यवहारांसाठी केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य UPI व्यवहारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सामान्य जनतेला या शुल्कातून पूर्णपणे दिलासा मिळाला आहे.

नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

सध्या फेस्टिव्ह सीजन सुरू असल्याने व्यापाऱ्यांना तात्पुरता दिलासा देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हा नियम किंवा MDR कधीपासून लागू केला जाणार, याबाबतची नवीन तारीख एनपीसीआयद्वारे स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

सावंतवाडीत बिहारी कामगाराचा संशयास्पद मृत्यू
October 16, 2026
पालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडीतील नवदुर्गेचे घेतले दर्शन
October 16, 2026
दोडामार्ग तालुक्यात शासकीय सुविधांना बळ
October 16, 2026
आमदार निलेश राणेंवर आक्षेपार्ह टिप्पणी
October 16, 2026
संबंधित बातम्या

View all

US Hindu Temple Attack Plot : हिंदू मंदिरांवर हल्ल्याचा कट उधळला
October 15, 2026
Supreme Court of India ruling on backward class reservation after conversion to Islam
Supreme Court judgment : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! धर्मांतर केल्यास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही
October 15, 2026
Central government approves 78-day Productivity Linked Bonus for eligible Indian Railways employees
Railway employees bonus 2026 : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ११.४० लाख कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस मंजूर
October 14, 2026
2026 Hero Xtreme 160R 4V motorcycle with updated styling
हिरो एक्सट्रीम 160 आर 4 व्हीचे नवे मॉडेल 'या' तारखेला होणार लॉन्च, काय असेल खास? वाचा सविस्तर
October 14, 2026