
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर पुरस्कृत मनोज फोंडेकर निर्मित गोवन मेलडिज ऑर्केस्ट्रा माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
सावंतवाडी माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित होत आहे. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, उपतालुका प्रमुख राकेश पवार, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, प्रणिल पोकळे, बबलू मिशाळ, दिलीप सांगावकर, गणेश गिरी, मिलिंद चोणकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








