
कणकवली : कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार कणकवली शहर आणि परिसरातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








