LIVE UPDATES

कुडाळ ओंकारनगर येथे वनराई बंधारा

पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार ; ओंकारनगर ,लायन्स क्लब कुडाळ यांचे सहकार्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 14:03 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ: लायन्स क्लब कुडाळ आणि ओंकार नगर येथील नागरिकांच्या विशेष सहकार्यातून तसेच मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून ओंकार नगर येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत वनराई बंधाऱ्याचे यशस्वी निर्माण करण्यात आले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून, आगामी काळात कुडाळ शहरात अशाच प्रकारे ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सदर कार्यक्रम ओंकार नगर येथे संपन्न झाला. याप्रसंगी लायन्स क्लब कुडाळच्या अध्यक्षा स्नेहा नाईक, अस्मिता बांदेकर, शोभा नाईक ,गुरुनाथ सावंत, पुंडलिक शिंदे, श्रेया सावंत, मधुकर कुंभार, केशव जाधव, सुधाकर पाटकर, सर्वेश पाटकर, सायमन रॉड्रिक्स, सतीश हुरलीकुप्पी, जनार्दन डीक्रूझ, अशोक पोईपकर, हरिश्चंद्र नेरूरकर, विनय पालकर, आनंद पाटकर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय श्रमदानातून हा बंधारा उभारण्यात आला असून परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक होत आहे.