LIVE UPDATES

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळतर्फे वेताळ बांबर्डेत वनराई बंधारा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 13:41 PM
views 28  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि जल संधारणाचे महत्त्व जपत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्काऊट-गाईड पथक आणि एन. सी. सी. युनिटच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी वेताळबांबर्डे (वाघभाटलेवाडी) येथील ओहोळावर "पाणी अडवा, पाणी जिरवा" अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियानही राबवले.

या स्तुत्य उपक्रमाला कुडाळ व मालवणच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव आणि स्थानिक ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्काऊट मास्तर रोहिदास राणे आणि एन. सी. सी. मार्गदर्शक विश्वजीत डांगमोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकांच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमाबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आणि प्राचार्या चैताली बांदेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.