LIVE UPDATES

विद्याधर भागवत व सी.श्री. उपाध्ये यांनी नवोदितांना घडविले : सतीश पाटणकर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 18:13 PM
views 12  views

सावंतवाडी : आपल्या जिल्ह्यातील प्रतिभेचे अलौकिक लेणे लाभलेले साहित्यिक व महान कवी आरती प्रभूंचे स्मारक म्हणून चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्था स्थापन करून विद्याधर भागवत आणि सी. श्री. उपाध्ये अनेकांना लिहिते करुन नवोदित घडवले, असे उद्गार ज्येष्ठ लेखक व मालवणी कला, संस्कृतीचे अभ्यासक सतीश पाटणकर यांनी येथे काढले. 

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात भागवत- उपाध्ये यांचे साहित्य : स्वरूप व परिचय हा परिसंवाद आयोजित केला होता. भागवत कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाला प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि श्री. शंकर प्रभू, रवींद्र भागवत उपस्थित होते. या कार्यक्रमात दहा अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले.

श्री. पाटणकर म्हणाले की, या दोघांनी नवोदितांचे लेखन प्रकाशित केले. पदरमोड करत 'आरती' मासिक सुरु करून नवोदितांना लेखन प्रकाशनाची वाट सुकर केली व आपणही कथा, कविता व कादंबरी लेखन करून कोकणी निसर्ग व माणसांचे जीवन चित्रण केले. मालवणी मुलखात शिक्षकी पेशा स्विकारून आपल्या मातीशी इनाम राखुन साहित्य उपासना, सेवा करणे हेच त्यांचे जीवन ध्येय होते. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी व कविवर्य वसंत सावंत यांनी प्रेरणा दिली. हे त्यांचे हे कार्य  चिरस्मरणीय आहे. या दृष्टीने हा उपक्रम फारच महत्वाचा आहे.

ते पुढे म्हणाले की, 'साहित्यिक उपक्रमांना अलिकडे उपस्थिती कमी मिळते. पण या परिसंवादाच्या  निमित्ताने चंदगड, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली येथील निबंधवाचक उपस्थित आहेत, जे बीज आपल्या  तत्कालीन साहित्यक्षेत्रातील वडिलधा-यांनी पेरले होते, त्याला मिळालेले हे यश आहे.

पुणे विद्यापीठात भागवत सरांच्या लेखनावर संशोधन पदवी मिळते, हा विद्याधर भागवत सरांचा गौरव आहे. या दोन्हीं लेखकांवर आज होणारी साहित्यिक चर्चा पुढील काळात मैलाचा दगड ठरेल व कोकणातील प्रत्येक कलावंत, लेखक, कवी यांच्या जीवनकार्यावर असे कार्यक्रम आयोजित करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

सुरुवातीला शंकर प्रभू यांनी भागवत सरांच्या काही कवींच्या सादर केल्या. श्रिया भागवत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर बाळकृष्ण लळीत यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. या परिसंवादात स्मिता शेटकर, अंजली मुतालिक, रवींद्र भागवत. श्वेतल परब, श्रिया भागवत, सुरेखा चव्हाण, बाळकृष्ण लळीत यांनी निबंध सादर केले. यावेळी विठ्ठल कदम, बाळ पुराणिक, रवींद्र ओगले, साधना तेंडुलकर, प्रा. भाऊ गोसावी, मयुर गवळी, विनायक महाबळ, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत  व अन्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजक रवींद्र भागवत यांनी आभार मानले.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Zilla Parishad Fund Allocation : निधीवाटपात दुजाभाव, अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात जाणार
October 19, 2026
सभेच्या विषयाशी सदस्यांचे आक्षेप असंबंधित : प्रमोद कामत
October 19, 2026
Golden Tarang procession during the traditional royal Dussehra festival in Otavane, Sindhudurg.
Otavane Dussehra Festival : ओटवणेचा ४५० वर्षांची परंपरा लाभलेला शाही दसरोत्सव उत्साहात
October 19, 2026
Sindhudurg administration raises awareness about legal child adoption procedures and child protection guidelines.
Legal Child Adoption Process in India : बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी कायदेशीर दत्तक प्रक्रिया आवश्यक
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg Zilla Parishad Fund Allocation : निधीवाटपात दुजाभाव, अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात जाणार
October 19, 2026
सभेच्या विषयाशी सदस्यांचे आक्षेप असंबंधित : प्रमोद कामत
October 19, 2026
Golden Tarang procession during the traditional royal Dussehra festival in Otavane, Sindhudurg.
Otavane Dussehra Festival : ओटवणेचा ४५० वर्षांची परंपरा लाभलेला शाही दसरोत्सव उत्साहात
October 19, 2026
Sindhudurg district officials reviewing the Sindhudurg.ai platform for water conservation impact analysis.
Sindhudurg.ai Water Conservation : जलसंधारण कामांचा परिणाम मोजण्यासाठी ‘sindhudurg.ai’ प्रणालीचा होणार वापर
October 19, 2026