
कणकवली : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रिगल कॉलेज, कणकवली यांच्या वतीने जानवली येथे नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटनस्थळे व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानासाठी जानवली ग्रामपंचायतीने विशेष सहकार्य केले. यावेळी सरपंच अजित पवार, ग्रामसेवक तुकाराम तावडे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांची, हनुमान मंदिर परिसराची साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. मुंबई–गोवा महामार्गालगतचा जानवली गाव परिसरही विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. रस्त्याच्या कडेला व परिसरात साचलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थाप्रमुख संजय राव शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक उपस्थित होते. रिगल कॉलेज, कणकवली यांच्या या उपक्रमाचे जानवली ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








