
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे गावातील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून झालेल्या निर्घृण खुनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत दु:खद वातावरणात रविवारी दामिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दामिनीच्या अंत्ययात्रेत प्रत्यक्ष सहभागी होत तिच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी पालव कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि सांत्वन केले. या कठीण प्रसंगात कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. या शोककळा पसरलेल्या प्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पप्पू पालव, संदीप सावंत यांच्यासह वर्दे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








