
रत्नागिरी : शहरातील चवंडेवठार येथील तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी लक्ष्मी चौक परिसरात घडली. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार) असे मृत तरुणाचे नाव आहे.
लक्ष्मी चौक परिसरात मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळताना स्मित चवंडे अचानक खाली कोसळला. चक्कर आल्यामुळे ते कोसळून बेशुद्ध होऊन पडले. लगेचच मित्रांनी ही गोष्ट स्मित चवंडे यांचे भाऊ सुशांत चवंडे यांना दिली. त्यानंतर चवंडे कुटुंबीय व मित्रांनी स्मितला तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
स्मित हा चवंडे वठारातील हरहुन्नरी युवक होता. तसेच तो एका पतसंस्थेत नोकरीला होता. आई-वडिलांच्या खानावळ व्यवसायात तो हातभार लावत असे. त्याच्यासारख्या युवकाचे अकाली निधन झाल्याने चवंडे वठार परिसरावर शोककळा पसरली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








