LIVE UPDATES

वेंगुर्ला नगरपरिषदेचा महिलांसाठी कौशल्यविकासाचा पुढाकार

फॅशन डिझायनिंगसह एआय व सायबर क्राईमचे मोफत प्रशिक्षण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 16:47 PM
views 5  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला व महाविद्यालयीन मुलींसाठी विशेष कौशल्य व तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांच्यात रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, या उद्देशाने तीन विविध प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत राबविण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील जास्तीत जास्त महिला व महाविद्यालयीन मुलींनी घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने महिला व बालकल्याण सभापती गौरी मराठे यांनी केले आहे.

या उपक्रमांतर्गत फॅशन डिझायनिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर क्राईम या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, फॅशन डिझायनिंगचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार असून, त्यातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

फॅशन डिझायनिंगचा परिपूर्ण कोर्स

फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणामध्ये ब्लाऊज शिवणकाम, ड्रेस तयार करणे, कटिंग व डिझायनिंग, आरी वर्क, नऊवारी साडी तयार करणे, जुन्या साडीपासून नवीन ड्रेस बनविणे, दुपटी, फ्रॉक आदी विविध प्रकारचे शिवणकाम व डिझायनिंग शिकविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना नवीन कौशल्ये आत्मसात करून घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची किंवा स्वतःच्या कौशल्याच्या आधारे रोजगार मिळविण्याची संधी मिळू शकते.

AI आणि सायबर सुरक्षेचेही प्रशिक्षण

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात महिलांनी मागे राहू नये, या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये AI ची ओळख, दैनंदिन जीवनातील त्याचा उपयोग, उपलब्ध मोफत AI साधनांचा वापर आणि डिजिटल कौशल्यविकास याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तसेच सायबर क्राईम प्रशिक्षणाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांची ओळख, त्यापासून बचाव, सुरक्षित इंटरनेट व सोशल मीडिया वापर आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय यांची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना डिजिटल व्यवहार करताना अधिक जागरूक व सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

२३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

या मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुक महिला व महाविद्यालयीन मुलींनी वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयातील ‘एक खिडकी’ विभागात अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करून आपली नोंदणी निश्चित करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर २०२६ असून, अर्जांची छाननी झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी वेळेत अर्ज करावेत.

महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देणारा आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास मदत करणारा हा उपक्रम असून, वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती गौरी मराठे यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

Justice Shailesh P. Brahme addressing lawyers at a Sindhudurg District Bar Association lecture on the Civil Procedure Code
Justice Shailesh Brahme : कायद्याची लक्ष्मणरेषा न्यायासाठीच!
October 19, 2026
कुडाळ तालुक्यात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस
October 19, 2026
Grain warehouse at Nerur Gondhyale in Kudal where insect infestation has raised concerns among local residents
नेरूर गोंधयाळे येथील धान्य गोदामातील किड्यांच्या उपद्रवाविरोधात ग्रामस्थांचा रोष
October 19, 2026
Gokul Dairy election vote counting in Kolhapur as Satej Patil-led panel takes the lead
Gokul Election Results 2026 : गोकुळ निवडणुकीत मोठी उलथापालथ, सतेज पाटील यांच्या आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर
October 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Justice Shailesh P. Brahme addressing lawyers at a Sindhudurg District Bar Association lecture on the Civil Procedure Code
Justice Shailesh Brahme : कायद्याची लक्ष्मणरेषा न्यायासाठीच!
October 19, 2026
कुडाळ तालुक्यात सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पाऊस
October 19, 2026
Grain warehouse at Nerur Gondhyale in Kudal where insect infestation has raised concerns among local residents
नेरूर गोंधयाळे येथील धान्य गोदामातील किड्यांच्या उपद्रवाविरोधात ग्रामस्थांचा रोष
October 19, 2026
Opposition members walk out of the Sindhudurg Zilla Parishad general meeting over the allocation of 15th Finance Commission funds
Sindhudurg Zilla Parishad News : १५व्या वित्त आयोगाच्या निधीवरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत वादंग
October 19, 2026