
कुडाळ : कुडाळ तालुका आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने अचानक रस्त्यावरील वाहनधारकांची व नागरिकांची काही काळ पळापळ झाली. मात्र, या पावसामुळे तालुक्यात कुठल्याही प्रकारचे मोठे आर्थिक किंवा भौतिक नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. काही वेळातच पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती पूर्ववत झाली असून तालुक्यातील जनजीवन सुरळीत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








